Saturday 26 April 2014

मी मातीतला ……(भाग - २)

              मृदा निर्मिती प्रक्रियेत प्रामुख्याने पुढील पाच घटक महत्वपूर्ण असतात .

  ) मूळ खडक )भूरूपे ) वनस्पती  आणि  ) कालावधी .
      आपल्याकडे विविध प्रकारची मृदा आढळते . उदा . कोकणात तांबडी मृदा आढळते , तर दख्खनच्या पठारावर आपल्याला काळी माती आढळते , बहुतेक विविध ठिकाणी आपल्याला विविध स्वरुपाची मृदा आढळते . त्याचं कारणही तसच आहे, ते म्हणजे मृदा निर्मिती प्रक्रियेत सहभागी असणारे घटक, त्यापैकी खडक हा महत्वाचा आहे , खडकाचा अपक्षय होऊन त्याचे बारीक तुकडे होतात आणि त्यात त्या त्या प्रदेशातील वनस्पती आणि त्याचबरोबरीने इतर जैविक घटक मिसळले  जातात , खडकाचे मूळ गुणधर्म आणि सबंधित प्रदेशातील हवामान याचाही प्रभाव मृदा निर्मिती वर होत असतोउदा . ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक आहे त्या प्रदेशात आपल्याला तांबडी माती आढळते . आपल्याकडे कोकणात तांबडी माती पाहायला मिळते . भूरुपांच्या बाबतीत विचार केला तर प्रदेशाचा उतार हा महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो . श्यक्यतो डोंगर उतारावर आणि डोंगराच्या पायथ्याला आपल्याला जाडी भरडी मृदा आढळतेत्याच बरोबर नदी , ओढे , नाले यांच्या सोबत वाहून आणलेल्या विदारित घटकांना आपण गाळ असे म्हणतो ,त्यामुळे पूर मैदाने , त्रिभुज प्रदेश तयार होत असतात . भारतात उत्तरेकडील सपाट मैदानी प्रदेश शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत .
    जगभरात सुमारे १२ प्रकारच्या मृदा आढळतात , त्यात प्रामुख्याने टुंड्रा मृदा , पॉडझाल मृदा , तांबडी मृदा , जांभी मृदा  इत्यादीचा प्रमुख समावेश होतो .
       मृदा निर्मिती मध्ये खडकाचे रासायनिक गुणधर्म , विदारणानंतर त्यात मिसळले जाणारे वनस्पती आणि इतर जैविक घटक, हवामान यांच्या रासायनिक अभिक्रीयेमुळे निर्माण होणाऱ्या  विविध प्रकारच्या मृदा हा निसर्गाचा अदभूत अविष्कार आहे .
   
मृदेचे थर @ खेड - शिवापूर  टोल नाका पुणे - सातारा रोड .  


Sunday 20 April 2014

मी मातीतला …… (भाग - १ )

    

     खरतर आपल्यात घडणाऱ्या बदलाचा आपण खूप गवगवा करतो . जगाला ओरडून सांगण्या इतपत आपल्यातील बदलाच कौतुक आपण करत असतो . पण निसर्ग …. त्याच्या बदलाच काय …  ? आपण सहज बोलून जातो " हल्ली पुर्वीसारख राहील नाही, आमच्या काळात कस अगदी" ……. !  अखिल मानव जातीत असंख्य बदल होत असतात आणि त्या बदलाचे साधक बाधक परिणाम सुद्धा आपल्या चर्चेत येत असतात . मानवी आयुष्याची कमाल मर्यादा जरी १०० वर्षे धरली . तरी या १०० वर्षात आपल्यात अनेक बदल घडत असतात . अगदी निसर्गात सुद्धा बदल घडत असतात पण मानवी काळाचे मूल्यमापन इथ चालत नाही , खरतर अलीकडच्या काही वर्षात आपल्याला निसर्गातील बदलाची दखल घेण क्रमप्राप्त झालय, कारण आपल्या मानव जातीवर त्याचे होणारे परिणाम आपल्याला दिसू लागलेत . निसर्ग त्याच्या निर्धारित वेळेनुसार त्याच्या बदलाच्या प्रक्रिया अबाधित राखत असतो किंबहुना ते निसर्ग चक्रच आहे आणि  निसर्ग नियमनासाठी ते आवश्यक आहे , पण त्याच्या या प्रक्रियेत आपला हस्तक्षेप हा बहुदा आपल्यालाच महागात पडत असल्याचे चित्र आपल्याकडे पहावयास मिळते  .
     निसर्गात घडणाऱ्या बदलांचा सूक्ष्म अभ्यास किंवा बारकाईने केलेलं निरीक्षण सुद्धा आपल्याला निसर्गातील विविध चमत्कारांचे गूढ उकलण्यास नक्कीच मदत करत . एखादी नैसर्गिक प्रक्रिया निसर्गतः पूर्ण होण्याचे विविध टप्पे जवळून पाहता येण हि सुद्धा खूप मजेची बाब आहे .
       सेंटी मीटर मातीचा थर तयार होण्यास सुमारे  हजारो वर्षाचा काळ लागतो हे सगळ्यांना माहित आहे . पण हि संपूर्ण प्रक्रिया पाहण आपल्याला  व्यवहारिक दृष्ट्या शक्य नाही . पण मातीचा थर तयार होताना नक्की कुठली प्रक्रिया होत असते हे आपल्याला माहित आहे . साधारण पणे  खडकावर बाह्य कारकांचा  उदा. ऊन , वारा , पाऊस  यांचा परिणाम होतो आणि खडकाचा अपक्षय होऊन खडक फुटतो , त्याचा भुगा होतो आणि त्याचे मातीत रुपांतरण होते मग त्यात झाडांचा पाला पाचोळा पडतो तो कुजतो मग सुपीक माती तयार होते. हि प्रक्रिया खूप मजेशीर आहे . एकसंध माती तयार होण्याची प्रक्रिया आपल्या अनुभवता येत नसली तरी  तिच्या निर्मिती प्रक्रियेतले  विविध टप्पे निश्चित पणे आपल्याला पाहता येतात . त्यासाठी आपण निसर्गात भटकंती करत असताना डोळसपणे आपल्याला भरभरून देणाऱ्या निसर्गाला पहायला पाहिजे , मग आपल्याला त्याच्यातील बदल निश्चित स्वरुपात पाहायला मिळतातअगदी आपल्या आजूबाजूला आपल्या आवडत्या सह्याद्रीत !!!!!
    आता खडक फुटतो म्हणजे नक्की काय  होत ? , खरतर दगड किंवा खडक  हा अलका कुबलच्या चित्रपटातील सुनेसारखा निसर्गातला अत्यंत सोशिक असा घटक, खरच त्याला बिचारा म्हंटल पाहिजे . त्याच कारणही तसच आहे , उन , वारा , पाऊस  आणि वाहत पाणी या बाह्यकाराकांचा सतत त्याच्यावर मारा होत असतो आणि त्यामुळे त्याची झीज होते , पण हे सगळ काही लगेच होत नाही एखादा बेसॉल्ट  ( अग्निजन्य खडक ) कणखर असतो त्याच्या तुलनेत रुपांतरीत खडक जरा मृदू असतो.  सांगण्याच तात्पर्य, खडकाच्या गुणधर्मानुसार तो बाह्य कारकाना प्रतिसाद देत असतो  आणि त्यावर त्याची झीज अवलंबून असते , निसर्गाच्या विविधतेत आपला प्रदेश संपन्न असल्यामुळे आपल्याकडे बहुतांश विविध प्रकारचे खडक आढळतात  पण त्यातल्या त्यात आपल्या कडे बेसॉल्ट  ( अग्निजन्य खडक ) मोठ्या प्रमाणत आढळतो. मृदा निर्मितीमध्ये विदारण हि प्रक्रिया फार महत्वाची असते. 




  खडक फुटण्याची प्रक्रिया त्याला  शास्त्रीय भाषेत  विदारण असे  म्हणतात @ कोयना नगर  धरण  परिसर (सातारा )
विदारण

   

 @@@@@@  मृदा निर्मिती प्रक्रियेतील आणखी गमतीदार गोष्टी पुढील भागात  लवकरच …….

आपला


दत्ता  माने .
dmanegeography@gmail.com