Monday, 14 July 2014
दुष्काळाची पूर्वपरीक्षा …… (भाग -१)
नेहमीच अंदाज चुकवणारा मान्सून आता येण्याची चाहूल देत आहे … मान्सूनच्या येण्याचे आपण फक्त अंदाजच बांधू शकतो … त्याच्या प्रतिक्षेनंतर आता पाऊस पडेल या आशेवर आपण आहोत ,पण त्याच्या येण्याची खरचं आपली तयारी झाली आहे ???
विकासाच्या रोल मॉडेलकडे वाटचाल करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील
पूर्वेकडील माण , खटाव , सांगोला , आटपाडी या तालुक्यांची कायम दुष्काळी तालुके हि ओळख विकासावर प्रश्न चिन्ह उभे करणारी आहे . कमी पर्जन्यमाना मुळे जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य हेच ज्वलंत वास्तव या तालुक्यात पहावयास मिळते . या तालुक्यांमध्ये अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या पाणी प्रश्नावरून आतापर्यंत निवडणुका लढवणारे आणि पाण्याच्या श्रेयवादावरून एकमेकांना शह देणारे राज्यकर्ते आणि दिशाहीन जनता सातत्याने पडणाऱ्या दुष्काळातून काहीच शिकले नाहीत , आणि जे शिकले अशा भगीरथांची पाटी कोरीच राहिली . गेल्या वर्षीचा साखळी बंधारे बांधण्याचा निर्णय हा शासनाचे " वरातीमागून घोडे " असाच होता .
Subscribe to:
Posts (Atom)