Saturday 26 April 2014

मी मातीतला ……(भाग - २)

              मृदा निर्मिती प्रक्रियेत प्रामुख्याने पुढील पाच घटक महत्वपूर्ण असतात .

  ) मूळ खडक )भूरूपे ) वनस्पती  आणि  ) कालावधी .
      आपल्याकडे विविध प्रकारची मृदा आढळते . उदा . कोकणात तांबडी मृदा आढळते , तर दख्खनच्या पठारावर आपल्याला काळी माती आढळते , बहुतेक विविध ठिकाणी आपल्याला विविध स्वरुपाची मृदा आढळते . त्याचं कारणही तसच आहे, ते म्हणजे मृदा निर्मिती प्रक्रियेत सहभागी असणारे घटक, त्यापैकी खडक हा महत्वाचा आहे , खडकाचा अपक्षय होऊन त्याचे बारीक तुकडे होतात आणि त्यात त्या त्या प्रदेशातील वनस्पती आणि त्याचबरोबरीने इतर जैविक घटक मिसळले  जातात , खडकाचे मूळ गुणधर्म आणि सबंधित प्रदेशातील हवामान याचाही प्रभाव मृदा निर्मिती वर होत असतोउदा . ज्या प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक आहे त्या प्रदेशात आपल्याला तांबडी माती आढळते . आपल्याकडे कोकणात तांबडी माती पाहायला मिळते . भूरुपांच्या बाबतीत विचार केला तर प्रदेशाचा उतार हा महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो . श्यक्यतो डोंगर उतारावर आणि डोंगराच्या पायथ्याला आपल्याला जाडी भरडी मृदा आढळतेत्याच बरोबर नदी , ओढे , नाले यांच्या सोबत वाहून आणलेल्या विदारित घटकांना आपण गाळ असे म्हणतो ,त्यामुळे पूर मैदाने , त्रिभुज प्रदेश तयार होत असतात . भारतात उत्तरेकडील सपाट मैदानी प्रदेश शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत .
    जगभरात सुमारे १२ प्रकारच्या मृदा आढळतात , त्यात प्रामुख्याने टुंड्रा मृदा , पॉडझाल मृदा , तांबडी मृदा , जांभी मृदा  इत्यादीचा प्रमुख समावेश होतो .
       मृदा निर्मिती मध्ये खडकाचे रासायनिक गुणधर्म , विदारणानंतर त्यात मिसळले जाणारे वनस्पती आणि इतर जैविक घटक, हवामान यांच्या रासायनिक अभिक्रीयेमुळे निर्माण होणाऱ्या  विविध प्रकारच्या मृदा हा निसर्गाचा अदभूत अविष्कार आहे .
   
मृदेचे थर @ खेड - शिवापूर  टोल नाका पुणे - सातारा रोड .  


   घाटात किंवा रस्त्याच्या बाजूला आपल्याला हे चित्र नेहमी पाहायला मिळत.  



 मृदेचे थर @ खंबाटकी घाट ,  पुणे - सातारा रोड .  






आपल्याला मृदेचे असे विविध थर पाहायला मिळतात त्या विषयी जाणून घेऊ …









         मृदा निर्मिती हि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मृदेच्या भूपृष्ठ भागापासून मूळ खडका पर्यंत मृदेमध्ये विविध थर तयार झालेले आपल्याला दिसून येतात. या थरांचा अभ्यास करण्यासाठी मृदा छेद ( Soil Cross Profile )आपल्याला नक्की मदत करतो . आपल्याकडे मृदेचे वितरण असमान आहे .  प्रदेशानुसार मृदा छेद निश्चित पणे त्या प्रदेशातील मृदा निर्मिती आणि विकासाची माहिती दर्शवतो .



 
 



आपला 

दत्ता माने ,
dmanegeography@gmail.com

x

No comments:

Post a Comment